अंबरनाथमध्ये मनसेकडून दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचाही सन्मान

 


 मृण्मयी जोशी या दिव्यांग विद्यार्थिनीचा विशेष सन्मान

अंबरनाथ \ अशोक नाईक  : अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या वतीने कानसई परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते.


दहावी आणि बारावीची परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांचीच नव्हे, तर त्यांच्या पालकांचीही परीक्षा असते. त्यामुळेच यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही मनसेकडून सन्मान करण्यात आला. कानसई परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मृण्मयी मिलिंद जोशी या दिव्यांग विद्यार्थिनीने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.


या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावीत यशस्वी झालेल्या समीरा महेश मिसाळ, मुग्धा समीर नवरे, सिद्धी कमलाकर दळवी, यश किसन चोपडे, ऋतुजा प्रवीण भोईर, शुभम संतोष राजपाल, निष्का नरेंद्र सागवेकर, तन्मय सेहगल, नीरज अरुण भोईर, हर्षिता दीपक ठाकरे, ऋषिकेश अनिल बोराडे, भाग्यश्री गणेश खारुक, सिमरन नितीन चैनानी, गौतमी विठ्ठल सुवणी, श्लोक बाळकृष्ण येवले, भूमी धनंजय कुलथे, हंसिका चंद्रकांत भोईर, निहार सूर्यकांत भोईर, मृण्मयी मिलिंद जोशी, आदिती आशिष मोहडकर, श्रुती सदानंद पाटील, सुमेध दिनेश भागवत, सार्थक नितीन हसुरे, भावेन शशिकांत भोईर, तेजस्विनी साहेबराव पाटील, माहीका तुषार व्यास, मिष्टी प्रवीण नेहते, राज भूषण गायकवाड, रुद्र रमेश आभाळे, रक्ष रमेश आभाळे, ललित विलास शेंडे, सुहास कोताराम भल्ला, तन्मय सकट, दुर्वा शैलेश सोनवणे, खुशी पंकज जाधव, अनया अमित वामनाचार्य, निधी पंकज जावडेकर, समीक्षा मिलिंद शिंदे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमाला मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्यासह जगदीश हडप, विजय इंगळे, भागवत खैरनार, मोहन पैठणकर, प्रशांत भोईर, जपेश भोईर, विनोद चौधरी आणि मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post