राज्यात १६ महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल


मुंबई : देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी युद्धसदृश परिस्थितीची तयारी म्हणून आज (मंगळवार) महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १६ महत्त्वाच्या ठिकाणी ही मॉक ड्रिल पार पडणार असून, नागरिकांमध्ये जनजागृती आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासाठी ही कवायत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थळ-वायशेत आदी शहरांचा समावेश आहे. 

या मॉक ड्रिलमागे मुख्य उद्देश नागरिकांना युद्धजन्य किंवा हवाई हल्ला झाल्यास ते कसे सुरक्षित राहू शकतील याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देणे हा आहे. युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था कशी कार्य करते याची चाचणी घेणे हा यामागचा दुसरा हेतू आहे.


मॉक ड्रिल दरम्यान काय घडणार?

सायरन वाजवले जाणार: हवाई हल्ल्याची पूर्वसूचना म्हणून सायरन वाजवला जाईल.

ब्लॅकआउट प्रोटोकॉल लागू: नागरिकांनी आपली घरातील आणि बाहेरील दिवे, इन्व्हर्टर, जनरेटर बंद ठेवण्याचे निर्देश आहेत.

आपत्कालीन प्रतिसाद पथक सक्रिय: एनडीआरएफ, होमगार्ड्स, अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सज्ज राहणार.

जनजागृती मोहीम: नागरिकांना काय करावे आणि काय टाळावे याची माहिती देण्यात येईल.


नागरिकांनी काय करावे?

  • सायरन ऐकल्यावर शांतता राखा आणि भीती न बाळगता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
  • ब्लॅकआउट प्रोटोकॉलनुसार सर्व प्रकाश उपकरणे बंद ठेवा.
  • घरातील लहान मुले, वृद्ध व महिलांना सुरक्षित स्थळी ठेवण्याची खबरदारी घ्या.
  • प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.






Post a Comment

Previous Post Next Post