सात वाहनांच्या अपघातात पाच जण जखमी
खोपोली \ धनंजय कवठेकर : मुबंई - पुणे एक्स्प्रेसवेवर शनिवारी सायंकाळी सात वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत.
मुबंई - पुणे एक्स्प्रेसवेवरून पुण्याहून मुबंईकडे ही वाहने जातं असताना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरघाटात आली असता हा अपघात झाला आहे, या अपघातात एक ट्रक, तीन बस आणि तीन कारचा अशा एकूण सात वाहनांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात १५ वर्षीय मुलीसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, हेल्प फाऊंडेशन यांचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघात ग्रस्त वाहनांमध्ये अडकेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, तर या अपघातानंतर एक्स्प्रेसवेवर काही काल वाहतूककोंडी झाली होती, ही सगळी वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरू करण्यात आली.