जून महिन्याच्या पहिल्या पावसातच रस्ते पाण्याखाली


डोंबिवली \  शंकर जाधव : बुधवारी सकाळी मुसळधार पाऊस पडल्याने डोंबिवलीतील काही भागात पाणी साचले. वाहनचालक अतिशय संथ गतीने वाहन चालवत पुढे जात होते. जून महिन्याच्या सुरुवातीला पसलेल्या पावसाने हवेत गारवा जरी आणला असला तरी रस्त्यावर साचलेले पाणी पाहून नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. 


अपघात होण्याची शक्यता आल्याने पालिकेच्या आपतकालीन विभागातील कर्मचाऱ्यांनी डोंबिवली विभागाची पाहणी करणे आवश्यक आहे. वृक्ष कोसळ्याची घटना घडली नसली तरी काळजी घेणे आवश्यक असून तसे दिसल्यास पालिका प्रशासनाला माहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post