कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शनिवारी शिवराज्याभिषेक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भारत बुळे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास उपमहापौर राहुल दामले यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास उपायुक्त कांचन गायकवाड, सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे, प्रसाद ठाकूर तसेच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

