पाचोरा आगारात तीन नवीन एसटी बसेस दाखल


आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पाचोरा (जि. जळगाव), : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाचोरा आगारात तीन नवीन एसटी बसेस दाखल झाल्या. या बसेसचे लोकार्पण आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पाचोरा बसस्थानकात संपन्न झाले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः बस चालवण्याचा आनंद लुटला. 

या नव्या बसेस पाचोरा–पुणे मार्गावर धावणार असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे. यापूर्वी आगाराकडे एकूण ५५ बसेस होत्या, त्यापैकी काहींची स्थिती निकृष्ट होती. नव्या तिन्ही बसेस आल्याने आगाराच्या ताफ्यातील बसांची संख्या आता ५८ झाली आहे.

उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले, “पाचोरा आगारासाठी अजूनही नव्या बसेस मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. टप्प्याटप्याने बसेस दिल्या जातील.” कार्यक्रमात रंगीबेरंगी रांगोळी सजवण्यात आली होती. प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी युवा नेते सुमित पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश जाधव, प्रयास पाटील, वाहतूक निरीक्षक राहुल नजन, राहुल पाटील, रवींद्र भोसले, नरेंद्र सोनवणे, जागृती पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



Post a Comment

Previous Post Next Post