दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी रोडवरील फेरीवाले हटवा


शिवसेना ठाकरे गटाच्या संघटिका योगिता नाईक यांची मागणी


दिवा \ आरती परब : दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनी रोड वरील फेरीवाले हटवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक यांनी दिवा प्रभाग समीतीकडे केली आहे.

मुंब्रादेवी कॉलनी रोड भागातील रहिवाशांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दातिवली शाखेला भेट देऊन मुंब्रादेवी कॉलनी रोडवरील फुटपाथवर चालण्यासाठी जागा नसल्याची समस्या मांडली असता विधानसभा संघटिका योगिता नाईक यांनी दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत सहाय्यक आयुक्तांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. सहाय्यक आयुक्तांकडे मुंब्रादेवी कॉलनी रोडवरील फुटपाथ लवकरात लवकर खाली करून नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. फेरीवाल्यांनी संपूर्ण रस्ता व्यापला असल्याने नागरिकांना चालण्याची अडचण होते. या गोष्टीकडे योगिता नाईक यांनी लक्ष वेधून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post