कल्याण \ शंकर जाधव : कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केट परिसरात राहणाऱ्या ८५ वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत केडीएमसी मुख्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. आजीबाईंच्या घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होत आहे. या विरोधात हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचे आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार असा पवित्रा आजींनी घेतला आहे.