गरजू विद्यार्थ्यांना जयंता पाटील यांचा मदतीचा हात

डोंबिवली \ शंकर जाधव : शिक्षण हीच खरी समृद्धी आहे.हेच जाणून सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जोपासून गेली २१ वर्ष शिवसेना शाखा आजदे पाडा व जे.पी.ग्रुप मित्र मंडळाच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप करण्यात आले. माजी सरपंच तथा कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख जयंता पाटील आणि कल्याण ग्रामीण उपतालुका युवा महिला अधिकारी काजल पाटील यांच्या पुढाकाराने विभागातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.यात ९४० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.


यावेळी जे.पी.ग्रुप मित्र मंडळाचे सभासद, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना, गट प्रमुख व शिवदूत उपस्थित होते.यावेळी पाटील म्हणाले, आम्ही कधीही निवडणुका समोर ठेवून काम करत नाही तर 365 दिवसं समाजसेवा करत असतो. आजदेपाडा येथे शिवसेना शाखेत आलेल्या सर्वांच्या डीअडचणी एकूण त्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. आजदेपाडा येथील नागरिक शिवसेना शाखा आल्यावर आपली समस्या सुटेल या आशेने येत असतो. समस्या सुटल्यावर शिवसेनेचे आभार मानायलाही विसरत नाही.




Post a Comment

Previous Post Next Post