दिवा \ आरती परब : आज पर्यावरण दिनानिमित्त एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष वसुंधरेसाठी या भाजपच्या विचारधारेने प्रेरित होऊन विजय अनंत भोईर यांनी गरुवारी दिवा टर्निंग येथे कार्यकर्त्यांसोबत वृक्षारोपण केले.
यावेळी अवधराज राजभर, नीलम मिश्रा, योगेश आगवणे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आज विजय भोईर यांनी सर्वांना आवाहन केले की, प्रत्येकाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकेक झाड तरी लावले पाहिजे. तसेच आजच्या दिवशी विजय भोईर यांनी डंपिंगच्या माध्यमातून दिव्याच्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो लवकरात लवकर थांबवला गेला पाहिजे, असे प्रशासनाला आवाहन केले आहे.