राज्यातील १० जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार

Maharashtra WebNews
0


महिला बचत गटांना मिळणार हक्काचे व्यासपी

मुंबई : राज्यातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये "उमेद मॉल" उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या मॉलच्या माध्यमातून बचत गटांना हक्काचे आणि स्थिर व्यासपीठ मिळणार असून त्यांचा आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने अनेकदा बाजारपेठेअभावी विक्री न होऊन थांबत होती. यावर उपाय म्हणून ग्रामीण विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान (उमेद) मार्फत हे मॉल उभारले जाणार आहेत. या मॉलमध्ये महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांना प्राधान्याने स्थान देण्यात येईल.


या मॉलच्या उभारणीमुळे महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी मिळेल. यामुळे उत्पादने योग्य किमतीत विकली जातील, दलालांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न वाढेल.


या योजनेचा पहिला टप्पा म्हणून राज्यातील १० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक मॉलमध्ये स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र स्टॉल्स, ग्राहकांना सोयीस्कर खरेदी सुविधा, तसेच विपणन व ब्रँडिंगसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


राज्यातील लाखो महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रामीण भागातील महिलांचे उद्योगधंद्यातील योगदान वाढावे आणि स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना उत्पादन विक्रीसाठी शहरांमध्ये वारंवार जावे लागणार नाही, तसेच त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्यमापन होईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)