दिवा \ आरती परब : भारतीय जनता पार्टीच्या वतीने व विजय वाघ यांच्या पुढाकारातून दिवा शहरात भव्य रोजगार मेळावा तसेच सर्वसमावेशक मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आधार कार्ड शिबीर, मेडिकल चेकअप, मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप, ECG तपासणी, ब्लड चेकअप आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून ४०० पेक्षा अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. रोजगार मेळाव्यासाठी १५ नामांकित कंपन्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यामुळे अनेक युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
या कार्यक्रमास नरेश पवार, विजय अनंत भोईर, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, तसेच रोशन भगत, आशिष पाटील, अंकुश मढवी, समशेर यादव, निलेश म्हात्रे, नितीन कोरगावकर, अशोक गुप्ता, जिलाजीत तिवारी, जयदीप भोईर, श्रीधर पाटील, सुदेश पाटील, विशाल गुप्ता, कल्पेश सारस्वत, राहुल साहू, वीरेंद्र गुप्ता, गणेश गुप्ता, प्रफुल साळवी यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या रोजगार व आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

