अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मोफत प्रशिक्षण



 मुलाखत २९ जुलै रोजी रावेर येथे, ऑनलाईन नोंदणी आवश्यक

जळगाव / अनुसूचित जमातीतील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर यांच्या वतीने अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


सदर प्रशिक्षण ०१ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होऊन १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिने १५ दिवसांचा असून, यामध्ये उमेदवारांना गणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी व मुलाखत तंत्र या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत २९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता रावेर येथे घेण्यात येणार आहे.

पात्रता:

  • उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा (जातीचा अधिकृत दाखला आवश्यक)

  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा

  • किमान १०वी उत्तीर्ण असावा

  • वय १८ वर्षे पूर्ण असावे

लाभ:

  • प्रशिक्षण कालावधीत दरमहा १००० रुपये विद्यावेतन

  • प्रशिक्षण पूर्ण केल्यावर चार पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र

  • उमेदवारांनी राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल

नोंदणी प्रक्रिया:

या प्रशिक्षणासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या शासकीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

मुलाखतीच्या दिवशी सादर करावयाची कागदपत्रे (मूळ व झेरॉक्स प्रत):

  • शाळा सोडल्याचा दाखला

  • १०वी, १२वी व पदवीचे गुणपत्रक

  • आधार कार्ड

  • बँक पासबुक

  • दोन पासपोर्ट साईज फोटो

  • अनुसूचित जमातीचा जात प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा:
कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,
प्लॉट नं. २, शनि मंदिर मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर.
दूरध्वनी क्रमांक: ०२५८४-२५१९०६


Post a Comment

Previous Post Next Post