“हा विजय माझ्या विठ्ठलाला अर्पण” – भावना घाणेकर

 


उरण नगरपरिषद निवडणुकीनंतर भावना घाणेकर यांची खा. शरदचंद्र पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट


उरण/मुंबई : उरण नगरपरिषद निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित नेत्या भावना घाणेकर यांनी सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी खा. पवार यांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीदरम्यान खा. शरदचंद्र पवार यांनी भावना देशमुख यांना आगामी काळातील लोकसेवा, जनतेशी थेट संवाद आणि उरणच्या सर्वांगीण विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. “साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उरणच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे भावना देशमुख यांनी यावेळी सांगितले.



या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्र्यक्ष शरदचंद्र पवार पक्षातील अनेक ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. तसेच भावना देशमुख यांच्यासोबत त्यांचे सहकारी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या विजयाबाबत भावना घाणेकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “उरण नगरपरिषद निवडणुकीतील हा विजय मी माझ्या विठ्ठलाला अर्पण करते.” साहेबांचे मार्गदर्शन आणि वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ लाभत असल्याने उरणच्या विकासासाठी नव्या ऊर्जेने, प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. उरणच्या पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न, सामाजिक विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




Post a Comment

Previous Post Next Post