ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी ये-जा करत असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आगमन-विलंब आणि लोकल गाड्यांची गर्दी पाहता, प्रवाशांना निवांत थांबता येईल अशी योग्य सुविधा यापूर्वी नव्हती. मात्र आता ही गरज पूर्ण करण्यात आली आहे.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, ठाणे स्थानकावर आधुनिक वेटिंग रूम आणि नवीन दर्जेदार कॅन्टीन प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले आहे. या सुविधांचा लोकार्पण सोहळा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹 वेटिंग रूमची वैशिष्ट्ये:
वातानुकूलित सुविधा
आरामदायी खुर्च्या
स्वच्छ पिण्याचे पाणी
शांत व विश्रांतीसाठी योग्य वातावरण
🔹 कॅन्टीनची वैशिष्ट्ये:
उत्तम दर्जाचं अन्न
वेळेवर सेवा
स्वच्छता आणि आरोग्याच्या सर्व निकषांची पूर्तता
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले, “प्रत्येक प्रवाशाला अन्न दर्जेदार मिळावे, वेळेवर मिळावे आणि स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याने जपली जावी, अशी स्पष्ट सूचना मी प्रशासनाला दिली आहे. तसेच “प्रवाशांच्या गरजेनुसार आणखी सुधारणा घडवून आणण्याचा आमचा निर्धार आहे. ही फक्त सुरुवात आहे.