केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Maharashtra WebNews
0


पुणे : केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ७९ वर्षे होते.

डॉ. टिळक हे शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे प्रगल्भ विचारवंत म्हणून ओळखले जात होते. टिळक महाराजांचा वैचारिक वारसा त्यांनी ‘केसरी’च्या माध्यमातून जपला आणि पुढे नेला.

त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव टिळकवाडा, पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजेनंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात डॉ. टिळक यांचे योगदान अनमोल राहिले आहे. त्यांच्या निधनाने टिळक घराण्यातील एक तेजस्वी परंपरा हरपली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)