मंदार वर्तक यांना ‘राज्यातील बेस्ट सीईओ’ पुरस्कार

Maharashtra WebNews
0

 


 रायगड जिल्हा सहकारी बँकेचा गौरव

अलिबाग \ धनंजय कवठेकर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे दिला जाणारा ‘राज्यातील बेस्ट सीईओ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.


या वेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र बँक असोसिएशनचे पदाधिकारी, बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, संचालिका सुप्रिया पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मंदार वर्तक यांनी हा पुरस्कार आपल्या सहकाऱ्यांच्या आणि संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्राच्या वतीने स्वीकारला.

वर्ष २०२२ मध्ये रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंदार वर्तक यांनी बँकेच्या आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली. त्यांच्या नेतृत्वात बँकेने –
🔹 ६५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय
🔹 देशातील सहकारी बँकांमध्ये पहिल्यांदाच संगणकीकरण
🔹 IMPS, QR कोड, मोबाईल बँकिंग, युपीआय सारख्या आधुनिक सेवा ग्रामीण भागात सुरू केल्या
🔹 पारंपरिक बँकिंगमधून आधुनिक पारदर्शक प्रणालीकडे वाटचाल
🔹 ६० हून अधिक शाखा आणि १७ एटीएमची साखळी

सहकार, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीचा त्रिवेणी संगम:
वर्तक यांनी बँकेच्या यशामागील सूत्र स्पष्ट करताना सांगितले की, "जयंत पाटील यांची दूरदृष्टी, उपाध्यक्ष सुरेश खैरे यांचे पाठबळ, संचालक मंडळाचे सहकार्य आणि माजी सीईओ प्रदीप नाईक यांचे मार्गदर्शन हे बँकेच्या यशामागे मूलभूत घटक आहेत."

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “संपूर्ण बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान आणि ग्राहकांचे प्रेम यामुळेच रायगड बँक राज्यात अग्रगण्य ठरली आहे. पुढील दोन वर्षांत बँकेचा व्यवसाय १०,००० कोटींवर नेण्याचे आमचे ध्येय आहे.”


मंदार वर्तक यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ एक व्यक्तीचा गौरव नाही, तर संपूर्ण रायगड जिल्हा सहकारी बँकेचा आणि राज्यातील सहकार क्षेत्राचा आत्मसन्मान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड बँकेने जी झेप घेतली आहे, ती अनेक सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)