दिवा / आरती परब : दिवा उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा विकास प्रतिष्ठान, शिवसेना शाखा - रिलायन्स टॉवर यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
आज सकाळी ११ वाजता सोबत दिव्यातील रेशन कार्डच्या झेरॉक्स दाखवून श्री सद्गुरु समर्थ कन्स्ट्रक्शन ऑफिस, वारेकर शाळेजवळ, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा पूर्व येथे धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमातून अनेक गरजू कुटुंबांना मदत मिळाली.
वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी कार्यांमुळे स्थानिक नागरिकांनी शैलेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.