निलेश पाटील व अर्चना पाटील धावले पूरगस्त नागरिकांच्या मदतीला




दिवा / आरती परब :  सोमवार  सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे दिव्यातील साबे गावातील सखल भागात पाणी साचून नागरिकांची दाणादाण उडाली. परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.



साचलेल्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. तसेच साबे गावातील कोकणरत्न चाळी, डिजे कॉम्प्लेक्स, गणेश मंदिर, जीवदानी नगर, डिजे २, डिजे ३, डिजे ४ आणि डिजे ५ या भागांची पाहणी करण्यात आली. पाण्यामुळे कित्येक कुटुंबांचे घरातील सर्व सामान भिजले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.


अशा संकट काळात नागरिकांना जेवणासाठी वणवण करावी लागू नये म्हणून निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी तातडीने जेवणाची सोय केली. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. जेवण वाटप, पाण्यातून नागरिकांना बाहेर काढणे या कामात शिवसैनिक तसेच राजे प्रतिष्ठान, दिवा पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.



Post a Comment

Previous Post Next Post