ठाकरेंच्या शिवसेनेकडून डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा


डोंबिवली \ शंकर जाधव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवात कोकणात  जाणाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथून एसटी सोडण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी झेंडा दाखवून एसटी सोडल्या. 




यावेळी म्हात्रे म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सवात कोकण जाण्याकरता डोंबिवलीतील अनेक कोकणवासी रेल्वे, एसटी आणि काहीजण खासगी बस व स्वतःच्या वाहनाने जात असतात. रेल्वे तिकीट बुकीग फुल, एसटी बुकिंग फुल यामुळे अनेक कोकणवासियांना कोकणात आपल्या गावी कसे जाऊ, गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरता वेळेवर घरी पोहोचू का अशी चिंता लागली असते.मोठा गावातील अनेक चाकरमांन्याकरता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एसटीची मोफत सेवा उपलब्ध करून दिला आहे. त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो.



Post a Comment

Previous Post Next Post