गणेश भक्तांचा संताप
डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी येथे गणेश मूर्तींची बुकिंग केली होती. मात्र, जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली. अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहेत. दरम्यान, गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून, संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.