गणेशोत्सवात मुंबई पालिका राबवणार ‘मोदक महोत्सव

Maharashtra WebNews
0


येत्या २१ ऑगस्टपर्यंत संकल्पना स्पष्ट होणार

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी एक खास आकर्षण असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ‘मोदक महोत्सव’ राबवण्याच्या तयारीत आहे. सध्या प्राथमिक चर्चेअंती हा महोत्सव साकारण्यात येत असून, २१ ऑगस्टपर्यंत याची अधिकृत संकल्पना आणि कार्यक्रमरचना स्पष्ट करण्यात येणार आहे.


गणेशोत्सव हा मुंबईतील सर्वात मोठा सार्वजनिक सण मानला जातो. याच पार्श्वभूमीवर, मोदक या बाप्पांच्या आवडत्या नैवेद्याभोवती संकल्पना केंद्रित करून सांस्कृतिक, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पाककला स्पर्धा, वर्कशॉप्स, आणि विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्याचा पालिकेचा विचार आहे.


पालिका सूत्रांनुसार, "गणेशोत्सवात पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मोदक महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे मोदक, विशेषतः पारंपरिक आणि फ्युजन चवदार पदार्थ सादर होतील."


कार्यक्रमाची अंतिम रूपरेषा, स्थळ, सहभागी संस्था आणि वेळापत्रक याची घोषणा २१ ऑगस्टपूर्वी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या उपक्रमातून मुंबईकरांना गणेशोत्सवाची आणखी रंगतदार अनुभूती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)