दिवा येथील स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे तसेच दिवाळी फराळ, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
दिवा \ आरती परब : दिवा बेडेकर नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहापूर मधील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा माहुली, खातिवली शाळेतील १६० विद्यार्थ्यांना दप्तर भेट देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलविले. तसेच १०० आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, पणत्या, कंदील व जीवनावश्यक वस्तूं, यामध्ये तांदूळ, डाळ, चणे, वाटणे, तेल, साखर, हळद, तिखट मसाला, मीठ, साबणचे वाटप करण्यात आले.
यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शशिकांत बेडेकर (बेडेकर इंग्लिश स्कूलचे संस्थापक) यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरळ, कार्याध्यक्ष विनोद घाग, सचिव वैभव पवार, खजिनदार योगेश बेंद्रे, सल्लागार राजन सकपाळ सहित प्रतिष्ठानचे ४० ते ४५ सभासद उपस्थित होते. यावेळी माहुली शाळेचे शिक्षक शांताराम घुले सर व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, स्वराज्य प्रतिष्ठाणची सामाजिक जाणीव पाहुन ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.