शौर्या अंबुरे -हर्ष राऊत यांचा ठाणे महापालिकेतर्फे सत्कार


ठाणे : बहरीन येथे झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्यपदक जिंकून ठाण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तसेच चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रिले या प्रकारात हर्ष राऊत यानेही रौप्यपदक प्राप्त केले आहे.

या दोन्ही ठाणेकर खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, आज ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करून दोन्ही खेळाडूंचा सत्कार केला.


या वेळी आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की,शौर्या अंबुरे आणि हर्ष राऊत यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर ठाण्याचे नाव देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवले आहे. ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असून, या दोन्ही खेळाडूंनी आगामी काळात आणखी यश संपादन करावे, अशी आमची अपेक्षा आहे.

कार्यक्रमास संदीप माळवी ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त (१) , क्रीडा विभागाचे अधिकारी, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भविष्यातही अशा खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.




Post a Comment

Previous Post Next Post