आता व्यवहारासोबतच बचतीचीही सुवर्णसंधी!
मुंबई : भारतभरातील एमएसएमई आणि एंटरप्राइजेससाठी मर्चंट पेमेंट्समध्ये अग्रणी असलेली पेटीएम (Paytm) जी आता फायनान्शियल सर्व्हिसेस वितरण क्षेत्रातही एक प्रभावी नाव ठरली आहे. यांनी आज गोल्ड कॉइन इनिशिएटिव्ह ची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना प्रत्येक पेमेंटवर गोल्ड कॉइन मिळणार असून ते डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करता येणार आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यवहार दीर्घकालीन बचतीची संधी बनणार आहे.
ग्राहकांना स्कॅन अँड पे, ऑनलाइन खरेदी, मनी ट्रान्सफर, मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट्स आणि ऑटो/रिकरिंग पेमेंट्स यांसारख्या सर्व व्यवहारांवर गोल्ड कॉइन मिळतील. सर्व प्रकारच्या युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग व्यवहारांवर हे रिवॉर्ड लागू होतील. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्ड किंवा रूपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट केल्यास ग्राहकांना दुप्पट गोल्ड कॉइन मिळतील.
प्रत्येक व्यवहारावर १% गोल्ड कॉइन मिळतील. १०० गोल्ड कॉइन = ₹१ मूल्याचे डिजिटल गोल्ड मध्ये रूपांतर करता येईल. जमा झालेले गोल्ड कॉइन कधीही डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करता येतील, तसेच अतिरिक्त सोनं खरेदी करण्याचीही सुविधा उपलब्ध असेल. या माध्यमातून व्यक्तिगत ग्राहक आणि छोटे व्यवसाय दोघेही व्यवहार करताना बचतीची सवय लावू शकतात.
पेटीएम गोल्ड कॉइनचे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतर करणे अतिशय सोपे आहे. फक्त पेटीएम ॲप उघडा, होम स्क्रीनवरील ‘गोल्ड कॉइन’ विजेटवर टॅप करा, तुमचा गोल्ड कॉइन बॅलन्स तपासा आणि बॅलन्स १,५०० कॉइन झाल्यावर ‘Convert to Digital Gold’ या पर्यायावर टॅप करा. काही सेकंदातच गोल्ड कॉइनचे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतर होईल. (१०० गोल्ड कॉइन = ₹१ मूल्याचे डिजिटल गोल्ड)
पेटीएमच्या या नव्या उपक्रमामुळे आता प्रत्येक व्यवहार केवळ खर्च न राहता सोन्यातील गुंतवणुकीची एक लहान पण खात्रीशीर सुरुवात ठरणार आहे.