दसरा मेळाव्याच्या औचित्याने दिवा स्टेशनवर जखमींना आधार
दिवा \ आरती परब : दसरा मेळाव्याच्या औचित्याने दिवा रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशांसाठी व्हीलचेअर देण्यात आली. शिवसेना ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांच्या पुढाकाराने, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हीलचेअर दिली.
शिवसेना संस्थापक हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या वारसा पुढे नेत हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी समाजकारणाची परंपरा जपत गरजू आणि जखमी नागरिकांना मदतीचा हात दिला.
यापूर्वीच दिवा स्टेशनचे स्टेशन मास्टर मनोज कुमार गुप्ता यांनी जखमी प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत तातडीने व्हीलचेअरची गरज असल्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन ॲड. मुंडे यांनी त्वरित पुढाकार घेत आज व्हीलचेअर दिली.
व्हीलचेअर प्राप्त झाल्यानंतर स्टेशन मास्टर गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले. समाजाशी असलेली बांधिलकी आणि सेवाभाव या उपक्रमातून अधोरेखित झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या प्रसंगी ॲड. रोहिदास मुंडे म्हणाले "शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून लोकांच्या सुख- दुःखात सदैव सोबत असलेली ताकद आहे. उद्धव यांच्या प्रेरणेने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून आम्ही हे कार्य करीत आहोत. दिव्यातील नागरिकांना सुखसोयी, आधार आणि मदत मिळावी हा माझा ध्यास आहे. व्हीलचेअर वाटप हा केवळ प्रारंभ असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर सेवा उपक्रम राबवले जातील."
यावेळी शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटिल, युवा सेना शहर अध्यक्ष अभिषेक ठाकूर, शहर समन्वयक प्रियांका सावंत, विभाग प्रमुख हेमंत नाईक, संजय जाधव,उप विभाग प्रमुख नितीन सावंत, अजित माने, संजय निकम, अशोक अमोंडकर, अमोल म्हात्रे, संदिप राऊत, शाखाप्रमुख कृष्णा जाधव, दत्ता भोसले, विलास उत्तेकर, श्रावणी कदम, शशिकांत कदम, उप शाखाप्रमुख शशिकांत कुंभारगण, महेश मुळम, धनाजी पोवार, सचिन चव्हाण, युवा उप शाखाप्रमुख राजेश गोफणे, गट प्रमुख राजेंद्र आगटे, संदिप जाधव, संमीर घाणेकर, शिवसैनिक भारती कांबळे, आकाश विचारे, सखाराम मोरे यांच्यासह दिवा स्टेशन मास्टर मनोज कुमार गुप्ता व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकारणाच्या या वाटचालीत प्रत्येक शिवसैनिकाने सहभाग घेतल्याने दिव्यातील शिवसेनेची एकजूट व बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली.