मुंब्र्याच्या दोस्ती येथील अनधिकृत इमारतींवर महापालिकेची तोड कारवाई

 


दिवा \ आरती परब :  उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४०५१/२०२३ मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील मुंब्र्यातील दोस्ती भागातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेने पोलीस बंदोबस्त ही कारवाई सुरू केली आहे.


आतापर्यंत, या कारवाईमध्ये दोन्ही इमारती रिक्त करण्यात आल्या. तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले. तसेच, सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत. उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) उमेश बिरारी यांनी दिली.


या कारवाईस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान भाईक आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post