जळगाव : राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींत २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, नशिराबाद या १६ नगरपरिषदांसह मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या सर्व शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १ डिसेंबर रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने ही सुट्टी देण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
ही सुटी राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेशानुसार देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांच्या सुट्यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
.jpeg)