सचिन पोटे यांनी दिला काँग्रेस कल्याण जिल्हाअध्यक्षपदाचा राजीनामा
सहा ब्लॉक अध्यक्षांचा राजीनामा
कल्याण \ शंकर जाधव : गेली अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत एकनिष्ठ असलेले सचिन पोटे यांनी बुधवार २६ तारखेला कल्याण येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या कल्याण जिल्हाअध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे दिल्याचे सांगितले.पक्षाच्या ध्येयधोरणेनुसार जिल्हाअध्यक्षपदावर पाच वर्षापेक्षा जास्त काळ राहता येत नाही असे पोटे यांनी यावेळी सांगितले. 'हा राजीनामा आहे नाराजीनामा नाही' असेही सांगण्यास पोटे विसरले नाहीत.
सचिन पोटे यांनी २०१४ पासून कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष पदावर काम केले.युवक काँग्रेस ते जिल्हाअध्यक्षपदापर्यत काम करताना पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदारी पुर्ण केल्याचे केल्याचे पत्रकार परिषदेत पोटे यांनी सांगितले.पोटे यांच्यासह लिओ मॅकेनराय -(उपाध्यक्ष),विमल ठक्कर (शहर अध्यक्ष ), शकील खान (ब्लॉक अध्यक्ष ),प्रविण साळवी (ब्लॉक अध्यक्ष ),मनिषा सर्जिने ( ब्लॉक अध्यक्ष, कल्याण पूर्व), अशोक कापडणे ( ब्लॉक अध्यक्ष ), सचिन भटेवरा (ब्लॉक अध्यक्ष) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेंची शिवसेना यांच्याकडून ऑफर होती का असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, निवडणुकाजवळ आल्या की विरोधकांना सत्ताधारी पक्षांकडून ऑफर असते. मात्र मी इतकी वर्ष पक्षात काम करतोय.मला कुठल्याही पक्षात जाण्याची आवश्यकता नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतून उमेदवार मिळवून नगरसेवक म्हणून निवडणूक आलेले माजी नगरसेवकांनीस्थानिक स्वराज्य संस्थेचे आगामी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीत व शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पोटे म्हणाले, ज्या पॅनलमधून निवडून येण्याची श्वाश्वती नाही अशांनी लोक दुसऱ्या पक्षात केला असा टोला पोटे यांनी लगावला.
