लाडकी बहीण योजना’साठी KYC मुदतवाढ देण्याची मागणी




माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ठाणे :  महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांचे KYC करण्याची अंतिम मुदत लवकरच संपत असल्याने अनेक महिलांना त्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः विधवा महिला व अविवाहित मुली, ज्यांना आई-वडील किंवा भाऊ नाहीत, अशा महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे तांत्रिक अडचणींमुळे शक्य होत नाही आहे.


या पार्श्वभूमीवर माजी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे (प्रमुख, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी) यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर केले. शिंदे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “अनेक पात्र महिलांना ‘लाडकी बहीण योजना’चा लाभ केवायसी प्रक्रियेअभावी मिळू शकत नाही. काही विधवा व अविवाहित महिलांचे आधारकार्ड अद्यतन न झाल्याने OTP पडताळणी शक्य होत नाही. त्यामुळे अशा महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ देणे अत्यावश्यक आहे. तसेच, “या प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावर विशेष कॅम्पचे आयोजन करून तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात,” अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकारी पांचाळ यांनी हे निवेदन स्वीकारून संबंधित विभागाला पाठविण्याचे आश्वासन दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post