भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
दिवा \ आरती परब : दिवा शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत असून, त्यासोबतच लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक सोईसुविधांवर ताण निर्माण झाला असून पाणीटंचाई ही दिवा परिसरातील गंभीर समस्या बनली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन दिवा शहरातील नागरिकांना अतिरिक्त 10 एमएलडी पाणीपुरवठा मिळावा, अशी मागणी केली.
सपना भगत यांनी या भेटीत ठाणे पालिकेकडे निवेदनपत्र सादर केले असून, नव्याने टाकण्यात आलेल्या पाण्याच्या लाईन्सचे तत्काळ वॉशआऊट करून वापरासाठी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
नागरिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निवेदन पत्र देते वेळी ठाणे भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, दिवा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य रोशन भगत, दुर्गेश मढवी आणि भाजपा पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.
