दिवा \ आरती परब : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या लोकाभिमुख कामांना प्रेरित होऊन युवासेनेचे दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
अभिषेक ठाकूर यांच्यासोबत युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये उपशहर अधिकारी सुयोग राणे, शाखाप्रमुख प्रतिक म्हात्रे, शहर सचिव उमेश राठोड, सोशल मीडिया समन्वयक विराज सुर्वे, विभाग अधिकारी आकाश शुक्ला, अक्षय भोईर, शाखा अधिकारी प्रथमेश गुरव, अमित पाटील, सूरज नाचरे, नयन ओझा, धीरज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे दिवा शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. भाजप नेतृत्वाने नव्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
