कोल्हापूर \ शेखर धोंगडे : पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये (६ जानेवारी ) येणाऱ्या अंगारकी संकष्टीला प्रवासी - भाविकांना गणपतीपुळे येथे जाण्यासाठी कोल्हापूर बसस्थानकातून थेट एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हि बस आगाऊ आरक्षणासाठी देखील उपलब्ध करण्यात आली असून शासनाने दिलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५०%, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य सवलत दिली जाणार आहे.
सदर बस मंगळवारी (६ जानेवारी ) सकाळी ७ वाजता निघून मलकापुर, निवळी फाटा मार्गे गणपतीपुळे येथे १२.०० वाजता पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासाला त्याच दिवशी दुपारी ३ वाजता निघुन कोल्हापूर येथे रात्री ८ वाजता येईल. तरी ज्या भाविक- प्रवाशांना या बसने जायचे आहे त्यांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी MSRTC Bus Reservation ॲप अथवा npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन आगाऊ तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
