दिवा शहरात शिवसेनेचा जल्लोषात प्रचाराला शुभारंभ तर शक्तीप्रदर्शन


दिवा \ आरती परब : शिवसेना दिवा शहर प्रभाग क्रमांक २८ मधील प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सपत्नीक गणेशाची आरती करून व नारळ फोडून केला. यावेळी ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.


यानंतर गणेश नगर येथील गणेश मंदिरापासून दातिवली येथील मध्यवर्ती शाखेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जमलेल्या उत्स्फूर्त गर्दीमुळे प्रभाग क्रमांक २८ मधील सर्व नगरसेवक निवडूनच आल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता.


तर शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी उत्स्फुर्त असे कार्यकर्त्यांना संबोधित भाषण केले. त्यात त्यांनी म्हटले की  “गेल्या आठ वर्षांत दिव्यात विकासकामे जी झालेली आहेत, त्याच जोरावर आगामी निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच उमेदवार कोण हे न पाहता 'धनुष्यबाण' हीच आपली निशाणी आणि एकनाथ शिंदे हेच आपले नेतृत्व आहे, हे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा," असे आवाहन मढवी यांनी कार्यकर्त्यांना केले. 


तर शेवटी मढवी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रत्येक नागरिकाच्या 'घरोघरी जाऊन संवाद साधण्याचे' आणि गेल्या पाच वर्षांतील दिव्यातील कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. प्रचाराच्या या भव्य शुभारंभामुळे प्रभाग २८ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच धार मिळाल्याचे चित्र दिसून आले.


यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उपशहरप्रमुख गणेश मुंडे, ॲड. आदेश भगत, माजी नगरसेवक दीपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, विभागप्रमुख अरुण म्हात्रे, केशव म्हात्रे, सचिन चौबे, चरणदास म्हात्रे, जगदीश भंडारी, राजेश पाटील, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना साक्षी मढवी तसेच अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post