दिव्यांग कर्मचार्यांचा गौरव
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साध्या पण सन्मानपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दिव्यांग कर्मचार्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “दिव्यांग कर्मचारी हे कोणत्याही संस्थेचा अविभाज्य घटक आहेत. त्यांना समान संधी, प्रोत्साहन आणि योग्य सहकार्य दिल्यास ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात. आजचा दिवस त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आहे.”
कार्यक्रमास संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील–चुयेकर, बयाजी शेळके, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
