९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न


रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणे व एस.एम.जी. विद्यामंदिर यांचा उपक्रम

दिवा \ आरती परब  : रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणे आणि एस.एम.जी. विद्यामंदिर, दिवा (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा शहरात ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा २०२५ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत दिव्यातील विविध शाळांमधील तब्बल ८०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कलागुणांची झलक सादर केली.


या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रंग, कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलात्मक सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात आनंदी व उत्स्फूर्त वातावरण पाहायला मिळाले.


या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, उपजिल्हा प्रांतपाल जितेंद्र नेमाडे, रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणेचे माजी अध्यक्ष साईनाथ म्हात्रे, ओम साई शिक्षण संस्थेचे सचिव स्वप्नील गायकर, तसेच गणेश टावरे, सीए विकास गुंजाळ उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.


या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजक संस्था, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक व पालकांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ही ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा यशस्वी व संस्मरणीय ठरली.



Post a Comment

Previous Post Next Post