शाहूपुरी पोलीस ठाण्याचे नूतनीकरण


पोलीस प्रशासनास पायाभूत सुविधांचा बळ

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करून आज उद्घाटन करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या शुभहस्ते झालेल्या उद्घाटन समारंभात पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या नूतनीकरणामुळे पोलीस ठाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन कामकाजाची गती वाढेल, तसेच नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. पोलीस प्रशासनाने आधुनिक सुविधांचा समावेश करून कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे.

उद्घाटनानंतर उपस्थितांना ठाण्याच्या नव्या सुविधांचे दर्शन घेता आले, ज्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांचा मनोबल वाढेल आणि नागरिकांशी पोलीस संबंध अधिक दृढ होतील असे पाहिले गेले.




Post a Comment

Previous Post Next Post