दिवा \ शंकर जाधव : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मेळावा आज सकाळी ११ वाजता दिवा– आगासन रोडवरील दळवीनगर मैदानात उत्साहात पार पडला.
या प्रवेशामध्ये मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच शाखा अध्यक्ष अशा विविध पदांवरील कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवसेनेच्या धोरणांवर विश्वास ठेवत आणि महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात “शिवसेना जिंदाबाद”, “महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मोतीराम दळवी, उपशहर अध्यक्ष मनसे, दिलिप गायकर, विभाग अध्यक्ष मनसे,कुशाल पाटील, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, अर्पित पोळ, वैष्णव दळवी, विदयार्थी सेना विभाग अध्यक्ष मनसे, नितिन आदवडे शाखा प्रमुख मनसे, विकी भगत शाखा प्रमुख मनसे, विशाल भिडे, निखिल पाटील, वेदांत दळवी, विशाल शिंदे, दुर्वेश दळवी, राहुल नाईक, संदिप शिंदे, सचिन गायकर, कौस्तुभ गायकर, चित्रा दळवी महिला आघाडी, चैतन्या दळवी, चैताली दळवी, ममता शिंदे, दिक्षा माने, जागृती जोशी इत्यादींनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत दिवा परिसरात शिवसेना– महायुतीची ताकद आणखी मजबूत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या मेळाव्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
