दिवा \ आरती परब: दिव्यात येणाऱ्या २७, २८ आणि २९ प्रभागामध्ये शिवसेनेचे दहा तर भाजपाचा एक उमेदवार निवडणुकीसाठी उभा होता. महायुतीलाच्या उमेदवारां विरोधात मनसे, उबाठा, वंचित आणि अपक्ष हे उभे ठाकले होते. दिव्यात गेल्या निवडणुकीला आठ नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी केलेल्या विकास कामांमुंळेच या आताचे सर्वजण विजयी झाले असे रमाकांत मढवी यांनी सांगितले. पण दिव्यात गेली कित्येक वर्षे विरोधात असलेले भाजपाची यावेळी युती झाल्याने मु्ख्य विरोधकांचे गणित कोलमडले. त्यामुळे महायुतीच्या विरोधात असलेले मनसे, उबाठा, वंचित आणि अपक्ष यांचा काही टिकाव लागला नाही. त्याचे फळ या अकरा उमेदवारांना मिळाल्याने त्या सर्वच्या सर्व सीट या ८ ते १० हजार मते मिळवून विजयी झाल्या.
त्यात प्रभाग क्रमांक २७ मधील अ) शैलेश पाटील - १८५०२ ब) स्नेहा अमर पाटील - १६१९५ क) दिपाली उमेश भगत - १५१५३ ड) ऍड. आदेश भगत १५२७७, तर २८ प्रभाग क्रमांक मधील अ) दिपक जाधव - १९३२० ब) दर्शना चरणदास म्हात्रे - १८२६८ क) साक्षी मढवी - १९६५३ ड) रमाकांत मढवी - १८९७८ आणि प्रभाग क्रमांक २९ मधील अ) बाबाजी पाटील - १३३२७ ब) वेदिका साहिल पाटील - ८८४० क) अर्चना प्रविण पाटील -११५२३ मते पडून विजयी झाले.


