महिला गटात रा. फ. नाईक संघ, पुरुष गटात शिर्सेकर्स अकॅडेमी विजेते

 


श्री मावळी मंडळ विभागीय खो-खो स्पर्धा 

ठाणे : श्री मावळी मंडळ, ठाणे यांच्या वतीने आयोजित द्वितीय विभागीय खो-खो स्पर्धा १७ व १८ जानेवारी रोजी संस्थेच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महिला गटात रा. फ. नाईक महिला खो-खो संघ (ठाणे) तर पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर) यांनी विजेतेपद पटकावले.

महिला गटातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. रा. फ. नाईक महिला खो-खो संघाने ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन (ठाणे) संघावर १०–९ असा अवघ्या एका गुणाने व केवळ ०:०३ सेकंद शिल्लक ठेवत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून रा. फ. नाईक संघाने संरक्षण स्वीकारले होते. मध्यंतराला दोन्ही संघ ५–५ असे बरोबरीत होते. वैष्णवी जाधव, प्रणिती जगदाळे, पूजा फरगडे, साक्षी तोरणे आणि गीतांजली नरसाळे यांनी विजयी संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. पराभूत ज्ञानविकास संघाकडून धनश्री कंक, तेजस्वी पोखरकर, रोशनी जुनघरे आणि प्राची वांगडे यांनी लढत दिली.




पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघाने ठाण्याच्या विहंग क्रीडा केंद्र संघावर १६–११ असा पाच गुणांनी विजय मिळवला. मध्यंतराला शिर्सेकर्स संघाने ९–४ अशी आघाडी घेतली होती. धीरज भावे, अनिकेत पोटे, प्रतीक देवरे, रामचंद्र झोरे आणि निहार दुबळे यांनी संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. विहंग क्रीडा केंद्र संघाकडून आकाश तोगरे, आदित्य कांबळे, सागर मोहंडकर व वैभव मोरे यांनी चांगला खेळ केला.

स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ नगरसेवक सुधीर कोकाटे (शिवसेना) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, चिटणीस रमण गोरे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील तसेच विश्वस्त  कृष्णा डोंगरे व केशव मुकणे उपस्थित होते.

पारितोषिक विजेते :

महिला गट :
विजेता – रा. फ. नाईक महिला खो-खो संघ (ठाणे)
उपविजेता – ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन (ठाणे)
तृतीय – शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर)
चतुर्थ – शिवभक्त स्पोर्ट्स क्लब (ठाणे)

उदयोन्मुख खेळाडू – गुड्डी राठोड
उत्कृष्ट संरक्षक – गीतांजली नरसाळे
उत्कृष्ट आक्रमक – धनश्री कंक, श्वेता जाधव
अष्टपैलू खेळाडू – वैष्णवी जाधव

पुरुष गट :
विजेता – शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर)
उपविजेता – विहंग क्रीडा केंद्र (ठाणे)
तृतीय – श्री सह्याद्री संघ (मुंबई उपनगर)
चतुर्थ – श्री मावळी मंडळ (ठाणे)

उदयोन्मुख खेळाडू – शुभम ढगळे
उत्कृष्ट संरक्षक – लक्ष्मण गवस
उत्कृष्ट आक्रमक – निहार दुबळे
अष्टपैलू खेळाडू – धीरज भावे




Post a Comment

Previous Post Next Post