डोंबिवली पॅनल क्रमांक 22 मध्ये मनसे–शिवसेना (शिंदे गट) यांचे वर्चस्व


चारही उमेदवार विजयी

डोंबिवली \ शंकर जाधव  : डोंबिवली महापालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 22 मधून मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे उमेदवार विजयी ठरले आहेत. मतमोजणीअंती चारही उमेदवारांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला आहे.


 मतमोजणीच्या निकालानुसार मनसेचे संदेश पाटील यांनी 18,546 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.  मनसेच्या रसिका संदेश पाटील यांनी 15,169 मते मिळवत विजय नोंदवला. शिवसेना (शिंदे गट) चे विकास म्हात्रे यांनी 15,854 मते मिळवत विजयी आघाडी घेतली. शिवसेना (शिंदे गट) च्या कविता म्हात्रे यांनी 15,804 मते मिळवत विजय मिळवला.


या निकालामुळे पॅनल क्रमांक 22 मध्ये मनसे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होताच परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत डोंबिवलीच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.





Post a Comment

Previous Post Next Post