नवीन HTE (EX) ट्रिममध्ये प्रथमच G1.5 पेट्रोलला सनरूफ
मुंबई : देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमोबाईल कंपनी किया इंडियाने कॅरेन्स क्लॅव्हिस (ICE) लाइनअपसाठी नवीन HTE (EX) ट्रिम सादर करून आपली उत्पादने अधिक आकर्षक केली आहेत. या नवीन ट्रिममध्ये प्रथमच G1.5 पेट्रोल व्हेरिएंटला सनरूफ देण्यात आले असून, कुटुंबकेंद्रित ग्राहकांसाठी हा एक महत्त्वाचा अपग्रेड मानला जात आहे.
नवीन HTE (EX) ट्रिम G1.5 पेट्रोल (₹12.54 लाख), G1.5 टर्बो-पेट्रोल (₹13.41 लाख) आणि D1.5 डिझेल (₹14.52 लाख) या पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध असून सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. ही ट्रिम विशेषतः 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये देण्यात आली आहे.
ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या या ट्रिममध्ये स्कायलाईट इलेक्ट्रिक सनरूफ, फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल (FATC), एलईडी डीआरएल आणि पोझिशन लॅम्प्स, एलईडी केबिन लॅम्प्स तसेच ड्रायव्हर साइड ऑटो अप/डाउन पॉवर विंडो यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
या लाँचबाबत प्रतिक्रिया देताना किया इंडियाचे मार्केटिंग अँड सेल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले की, ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित ही नवीन ट्रिम विकसित करण्यात आली असून, आरामदायीपणा, सोयीसुविधा आणि मूल्य यांचा उत्तम समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. G1.5 पेट्रोलमध्ये प्रथमच सनरूफ देऊन कॅरेन्स क्लॅव्हिस कुटुंबांसाठी अधिक आकर्षक पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन HTE (EX) ट्रिमच्या लाँचमुळे किया इंडियाने कॅरेन्स क्लॅव्हिस (ICE) लाइनअप अधिक विस्तारत ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधोरेखित केला असून, स्पर्धात्मक भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे.
%20ICE.png)