मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज अधिकृत कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या पश्चात १९९० तुकडीचे भारतीय पोलीस सेवा (भा.पो.से.) अधिकारी सदानंद दाते यांनी महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
प्रशासनिक अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि कर्तव्यनिष्ठा यासाठी ओळखले जाणारे सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण तसेच आधुनिक पोलिसिंगसाठी त्यांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलासाठी हा नेतृत्वातील बदल महत्त्वाचा मानला जात असून, नवीन पोलीस महासंचालकांकडून नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

