दिव्यात शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन उत्साहात संपन्न


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम;  चाकरमान्यांची तुफान गर्दी 

दिवा \ आरती परब : कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ४ फेब्रुवारी रोजी शिवसेना शाखा गणेशपाडा व कोकण युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नगरसेविका दर्शना चरण म्हात्रे, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांच्या तर्फे हे शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन आयोजीत करण्यात आले होते. श्री गणेशविद्या मंदिर, गणेशपाडा येथे रात्री ९ ते १.३० वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तेव्हा चाकरमान्यांची तुफान गर्दी पहायला मिळाली.


या कार्यक्रमास दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेविका साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, सरिता मढवी, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, जयदास शेलार, सोपान म्हात्रे, संतोष देसाई, राम पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात सादर झालेल्या या लोकनाट्य नमन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.



Post a Comment

Previous Post Next Post