अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक आणि आत्मनिर्भरतेला गती



किया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिपादन 

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा शाश्वत आर्थिक वाढीसाठी स्पष्ट आणि प्रगत दृष्टिकोन ठरवणारा असल्याचे किया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वांगू ली यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि आर्थिक शिस्तबद्धतेवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.


रस्ते, रेल्वे, मालवाहतूक कॉरिडॉर आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये सातत्याने होणारी गुंतवणूक, तसेच नवीन आर्थिक क्षेत्रांचा आणि हाय-स्पीड कॉरिडॉरचा विकास यामुळे देशभरात संतुलित विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ली पुढे म्हणाले की, प्रगत उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन, दुर्मिळ खनिजांचे कॉरिडॉर आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (MSME) सक्षमीकरणावर दिलेला भर ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनाला अधिक बळ देणारा आहे. यामुळे भारताचा जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचा प्रवास अधिक दृढ होईल.


या सर्व उपाययोजनांमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल आणि तंत्रज्ञानाधारित, स्थिर व शाश्वत गतिशीलतेकडे (मोबिलिटी) जाण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, किया इंडिया भविष्यासाठी सज्ज असलेल्या गतिशीलता सोल्यूशन्सच्या माध्यमातून या परिवर्तनात अर्थपूर्ण योगदान देण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post