दोस्ती गृहसंकुलात कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

 


माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला

दिवा / आरती परब :  शिळफाटा येथील प्लॅनेट नॉर्थ दोस्ती गृहसंकुलात शेकडो नागरिक वास्तव्यास असून परिसरात दोस्ती फाउंडेशन शाळाही आहे. मात्र गृहसंकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना धूळ व खड्यांचा त्रास सहन करावा लागत होता.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या प्रचारादरम्यान नागरिकांनी ही समस्या माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी मुंब्रा–पनवेल मुख्य रस्त्यापासून दोस्ती गृहसंकुलापर्यंत रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक संपल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता करत माजी आमदार सुभाष भोईर यांनी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ३५० मीटर लांबीचा कॉंक्रिट रस्ता मंजूर करून घेतला.

या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले असून, यामुळे गृहसंकुलातील रहिवासी व शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिसरातील वाहतूक व दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या प्रसंगी सुमित सुभाष भोईर, आरिफ शेख, जावेद शेख, शमशुनिषा हुसेन, फईम शेख, हनीफ पठाण, ॲड. तन्वीर, ॲड. मुफ्ती, अनवर कच्छी तसेच दोस्ती गृहसंकुलातील रुबी, एल्मोर, जेड, एमरॉल्ड सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व नागरिक, दोस्ती ग्रुपचे वरिष्ठ अभियंता श्रीपत आणि सुधीर चव्हाण उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post