सिवूड्स रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांसाठी खासदारांना निवेदन

 


संस्कार फाऊंडेशनचा पुढाकार; सरकत्या जिन्यांसह इतर समस्यांवरही चर्चा

नवी मुंबई : सिवूड्स रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत संस्कार फाऊंडेशनच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. स्थानकात प्रवाशांच्या सिवूड्स रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांसाठी खासदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकते जिने (Escalator) बसविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.


वाढत्या प्रवासी संख्येमुळे सिवूड्स स्थानकात दररोज ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांना पायऱ्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ व्हावा यासाठी एस्कलेटर बसविणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.


या भेटीदरम्यान स्थानक परिसरातील स्वच्छता, दिशादर्शक फलक, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच गर्दीच्या वेळी होणारी गैरसोय अशा इतर महत्त्वाच्या समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार नरेश म्हस्के यांनी या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.


यावेळी संस्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर अमीन बागवान यांच्यासह सुरेश माळवे, मिलिंद मोटे, शशी दरेकर आणि शिवम ठाकूर उपस्थित होते. संस्कार फाउंडेशनकडून नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षित प्रवास आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला जाणार असून, नागरिकांच्या तक्रारी व सूचनांसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन स्तरावर पुढील काळातही प्रयत्न सुरू राहतील, असे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post