उपवनमधील लघु उद्योजकांच्या पाठीशी आमदार संजय केळकर

 


 मेट्रो मार्गिकेची प्रत्यक्ष पाहणी

ठाणे उपवन परिसरातून प्रस्तावित अंतर्गत रिंग मेट्रो मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या लघु उद्योजकांच्या समस्यांची दखल घेत आमदार यांनी मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक , संबंधित अधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात उद्योजकांनी त्यांच्या अडचणी आमदार केळकर यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यानंतर आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि उद्योजकांच्या भावना व मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.


उपवन परिसरातील अनेक उद्योग गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कार्यरत असून, या उद्योगांवर कोणताही अन्याय होऊ नये तसेच मेट्रो प्रकल्पामुळे त्यांच्या व्यवसायावर कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्याची सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे केळकर यांनी सांगितले. नागरिकांच्या सूचनांनुसार इतर ठिकाणी मार्गिकेत बदल करण्यात आले असल्याने उपवन परिसरासाठीही सकारात्मक पर्याय शोधण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या संदर्भात सर्वप्रथम बाधित होणाऱ्या उद्योगांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित अधिकारी, उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय करण्यात येणार आहे. यावेळी आमदार केळकर यांनी उपवनमधील लघु उद्योजकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. पुनर्वसनाची आवश्यकता निर्माण झाल्यास ते सध्याच्या व्यवसायस्थळांच्या जवळपासच व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

विकासकामे आणि स्थानिक उद्योजकांचे हित यामध्ये समतोल राखत सर्व बाधित उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Post a Comment

Previous Post Next Post