ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी

 


जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

ठाणे : समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत आदेश जारी करत जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्रीस तात्काळ मनाई केली आहे.

नवीन आदेशानुसार, पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या टाकीतच भरले जाईल. प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही भांड्यात इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन बेकायदेशीर ठरणार असून पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवणे व विक्रीची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पंप मालक व व्यवस्थापकांवर सोपविण्यात आली असून हा आदेश २७ मार्च २०२६ पासून तत्काळ लागू झाला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत तो लागू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

या मोहिमेत पोलीस यंत्रणेलाही सक्रिय करण्यात आले असून ठाणे शहर, व येथील पोलीस आयुक्त तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच , आणि या कंपन्यांना जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सार्वजनिक हितासाठी घेतलेल्या या निर्णयाची सर्वांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.


#ठाणे #ThaneNews #PetrolDiesel #FuelBan #BreakingNews #MaharashtraNews #PetrolPump #PublicSafety #LawAndOrder #FuelCrisis #NoLooseFuel #PetrolBan #DieselBan #PoliceAction #DistrictAdministration #ViralNews #SocialMediaAlert #EmergencyMeasures #IndianNews #LatestNews

Post a Comment

Previous Post Next Post