केडीएमसीत स्थायी, शिक्षण व महिला-बाल कल्याण समिती सभापतींची बिनविरोध निवड

 


कल्याण : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापतीपदी मल्लेश शिवन्ना शेट्टी, शिक्षण समिती सभापतीपदी अभिजीत सुजाता सदानंद थरवळ तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांची निवड घोषित झाली.



या तिन्ही पदांसाठी २ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यानुसार विशेष सभेत अधिकृत घोषणा करण्यात आली. या बैठकीस महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्यासह संबंधित समित्यांचे सदस्य उपस्थित होते.



तसेच आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले आणि इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. महानगरपालिकेतील या निवडीमुळे महायुतीला संघटनात्मक बळ मिळणार असून, आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Post a Comment

Previous Post Next Post